गोवा

गोवा म्हटलं की सर्वप्रथम समुद्र आठवतात. समुद्र म्हटलं की त्यातून वाहणाया निर्जळ लाटा आठवतात.लाटा म्हटलं की त्याला बघून खेळायला चंचल व आतूर झालेले मन आठवते.गोवा ह्या छोट्याश्या शहरात एक गोष्ट सांगायला सुरुवात केली, की त्यातून जुळून आलेल्या अनेक गोष्टी आपोआप आठवून येतात.

ह्याचं छोट्याश्या गोव्यात समुद्र किनारे वसलेली एक सुंदर जागा म्हणजे Baga retreat house जिथे मनाला एक वेगळ्याचं प्रकारची शांतता लाभते .स्वता:हाचे भान विसरुन मन त्या जागेच्या सुंदरते मध्ये हरपून जाते. retreat म्हटलं की नव्याने केलेली सुरुवात जाणवते, आणि अशी नव्याने बहाल केलेली सुरुवात कुणाला नाही बरे आवडणार.

ह्या जागेची शोध कुठून व कसे झाले त्यापेक्षा महत्वाची गोष्टी म्हणजे तेथे वसलेली शांतता.मनाला प्रचंड आनंद देऊनी जाते.पोर्तुगीज काळची घरे, वस्तु कोणाला नाही बरे आवडणार ,कारण त्या काळची गोष्टचं वेगळी होती.

प्रत्येक पोर्तुगीज काळची घरे, वस्तु आताच्या काळात कीती मौल्यवान मानली जातात.अशा पोर्तुगीज काळतील अनेक वस्तु Baga retreat house मध्ये देखील आढळतात.

समुद्र किनारी वसलेल्या ह्या Baga retreat house ची सुंदरता डोळ्याचे पाराने फेडूनी जाते.तेथील प्रत्येक रुमच्या खिडकीतून वेधुन घेणाया, मंजूळ वाहणाया लाटा मनाला प्रसन्न करतात. त्या घरातील माळ्यावरुन पुर्ण द्रुश्य अगदी सर्व सुंदरता व्यतीत करुनी जाते.तसेचं तेथे वाहणारे मंजूळ वारे समुद्राच्या लाटांची साथ देतात की काय असे मनाला वाटू लागते .

ह्या Baga retreat house मध्ये बसून हाचं आनंद लुटत रहावा असे वाटते. तसेचं पहाटे आणि सायंकाळची सुर्याची किरणे जणू त्या घराला आणखीण प्रकाशीत करत होती.ह्या सर्व गोष्टी स्वता:हा सर्वानी एकदातरी अनुभवावे म्हणजे सर्वांना कळेल की त्या घराची सुंदरता काय ,आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वता:मध्ये अनुभवलेला बदल नक्की समजून येईल